अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान...
मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांची पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत त्यांच्या मुलगीने भावनिक पोस्ट करत आईची हिम्मत वाढवली आहे.
मेधा मांजरेकर यांच्या कॅन्सरच्या उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे. त्यांची किमोथेरपी सुरू आहे. सध्या त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी केसही कापले आहेत.
सई मांजरेकरने पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “तू खूप जास्त खंबीर आहेस…मला तुझा अभिमान आहे आई…”