अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर 'इतक्या' हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

<p>अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर 'इतक्या' हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश</p>

कोल्हापूर - अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला एकवीस मे रोजी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २९४ महाविद्यालयासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एकूण ७१ हजार २१० प्रवेश क्षमतेसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.  या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी नुकतीच पार पडली आहे.

 यामध्ये आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर अद्याप २८ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षक संचालक डॉ. गणपती कळमकर यांनी दिली.

कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्यावतीने ऑनलाईन प्रवेश सहाय्यता कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते महाविदयालय निवडण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे.