सरकारला सोनम वांगचूक यांचा बळी हवाय : खा.संजय राऊतांचा सरकारवर आरोप 

<p>सरकारला सोनम वांगचूक यांचा बळी हवाय : खा.संजय राऊतांचा सरकारवर आरोप </p>

मुंबई – गेल्या 14 ते 15 दिवसांपासुन कॉक्रोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये  सोनम वांगचूक हे सहभागी झाले आहेत त्यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडत आहे. यावर खा.संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 

खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला आज 14-15 दिवस झाले असून शरीराने कोसळून पडले आहेत, तरुणांनी रस्त्यावर यावं,  सरकारला सोनम वांगचूक यांचा बळी हवाय. त्यांना लढणारे लोक नको आहेत. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही, त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहेत. या सरकारची नियत हीच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.