कसबा बावडा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात नवीन प्रभावळीचे लोकार्पण

<p>कसबा बावडा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात नवीन प्रभावळीचे लोकार्पण</p>

कोल्हापूर - कसबा बावडा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या आकर्षक प्रभावळीचे लोकार्पण आज शनिवारी सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी हनुमान मूर्तीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. त्यानंतर नव्याने बसविण्यात आलेल्या प्रभावळीचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास नगरसेवक सचिन चौगुले, सुभाष बुचडे, माजी नगरसेवक मोहन सालपे, अजित पवार धामोडकर, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती शितल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, विद्यानंद जामदार, धनाजी गोडसे, युवराज उलपे, अप्पा कुंभार, तानाजी चव्हाण, मिलिंद रामदेवे, राजू जाधव, संतोष गायकवाड, बाळकृष्ण बोनगे, निशिकांत कांबळे, राजू ढेरे तसेच हनुमान भक्त मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.