‘या’ जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के 

<p>‘या’ जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के </p>

हिंगोली – काल मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण परिसराला भूकंपाचा धक्का बसला आहे. ३.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा धक्का होता. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता.
या धक्क्यांमुळे अनेक घरातील खिडक्यांच्या काचांना धक्का बसला आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी झालेली नाही.