मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे...: आ.आदित्य ठाकरेंचे खळबळजनक वक्तव्य
मुंबई - “मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन असेल. माझे हे शब्द लक्षात ठेवा” असे खळबळजनक वक्तव्य आ.आदित्य ठाकरे यांनी केले आहे त्यामुळे उलट- सुलट चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय हालचाली केवळ पक्षांतरापुरत्या मर्यादित नाहीत. त्यामागे देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा आ. आदित्य ठाकरे यांनी केला आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.