मांडरेत ६३ हजारांचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त... एक जण ताब्यात

<p>मांडरेत ६३ हजारांचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त... एक जण ताब्यात</p>

कोल्हापूर - करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मांडरे येथील गोवा बनावटीच्या मद्याची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने मांडरे येथे छापा टाकत गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्या सर्जेराव सदाशिव जगताप याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ६३ हजार ८४० रुपये किंमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला. यात विजय मारुती पोवार याचाही सहभाग आढळून आल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.