उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसण्याची शक्यता...
मुंबई - विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असताना त्यांना आणखी धक्के बसण्याची शक्यता आहेत.
आमदार वरुण सरदेसाई आणि वरळी मतदारसंघ सोडणारे कट्टर शिवसैनिक सुनील शिंदे हे एकनाथ शिंदेंच्या वाटेवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.