विधान परिषदेच्या उपसभापती पदी सचिन अहिर यांची एकमताने निवड 

<p>विधान परिषदेच्या उपसभापती पदी सचिन अहिर यांची एकमताने निवड </p>

मुंबई – आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे बंडखोर आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी एकमताने निवड झाली आहे. 

उपसभापती पदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेत उपस्थित होते.  उपसभापती पदासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड झाली. त्यामुळे उमेदवारीचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती पदी नियुक्ती झाली आहे.