टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी  : भारतीय दलित महासंघ

<p>टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी  : भारतीय दलित महासंघ</p>

कोल्हापूर – नीट पेपरफुटी प्रकरण ताजे असताना टीईटीचा पेपर फुटल्याने राज्यातील लाखो शिक्षकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय दलित महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्याची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी, सुरज अवघडे, अमोल कांबळे, सनी प्रसाद, दयानंद कांबळे, राजू कांबळे, आकाश कांबळे, चंद्रकांत काळे, बबलू चौगुले, दशरथ बागडे, रामचंद्र खटावे, लक्ष्मण पवार, राहुल माने, प्रवीण वाघमारे, प्रशांत कांबळे उपस्थित होते.