कोल्हापुरात उत्थान – ICAI MSME महोत्सव उत्साहात 

<p>कोल्हापुरात उत्थान – ICAI MSME महोत्सव उत्साहात </p>

कोल्हापूर – वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल अंतर्गत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यावतीने आज  'उत्थान – ICAI MSME महोत्सव उत्साहात पार पडला.
या महोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी एमएसएमई उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. सी.ए. चंदन लाहोटी यांनी एमएसएमईसाठी उपलब्ध विविध संधी या विषयावर उद्योगवाढीच्या नव्या संधी स्पष्ट केल्या. सी.ए. नितीन हरगुडे यांनी एमएसएमई उद्योगांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सिद्धार्थ पंडित यांनी, ब्रँडिंग व व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा याविषयी आधुनिक मार्केटिंग तंत्रांची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी.ए. अशिष सेवेकरी यांनी प्रास्ताविक केले.


ॲड. धनेश राळे यांनी एमएसएमईसमोरील व्यावहारिक समस्या व त्यांवर मात करण्याचे उपाय या विषयावर कामगार कायदे, मानवी संसाधन, पर्यावरणविषयक अनुपालन तसेच स्थानिक प्राधिकरणांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे सखोल विवेचन केले. तसेच सी.ए. यतीराज मर्दा यांनी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रोत्साहनपर योजना, अनुदाने व सवलतींचा उद्योगांना कसा लाभ घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष सी.ए. आलोक शहा, सचिव सी.ए. राघवेंद्र बकरे, खजिनदार सी.ए. निखिल देवणे, माजी अध्यक्ष सी.ए. नितीन हरगुडे तसेच विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षा सी.ए. प्रीती पाचोरे,विविध उद्योग, व्यापार व व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट्स, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.