शाहूवाडीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
कोल्हापूर - शाहूवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला ३८ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले आहे.
तक्रारदाराकडून शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यानं रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी ३८ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने सापळा रचून वनमोरे याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यात वनमोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.