कोल्हापूरचा सुपुत्र, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत अनिल जाधव यांची आयकर विभाग, मुंबई येथे निवड...!
कोल्हापूर – कोल्हापूरचे सुपुत्र अनिकेत अनिल जाधव यांची आयकर विभागात निवड झाली आहे. अनिकेत जाधव हे फुटबॉलच्या मैदानावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. FIFA U-17 विश्वचषकात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खेळाडू ठरले आहे. तसेच 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्यांनी कोल्हापूर आणि भारताचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे.