गडहिंग्लज-नेसरी मार्गावर मोठी दुर्घटना... वाहतूक पूर्णपणे बंद

<p>गडहिंग्लज-नेसरी मार्गावर मोठी दुर्घटना... वाहतूक पूर्णपणे बंद</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-नेसरी मार्गावर आज शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. भडगाव येथील पर्यायी पुलाचा काही भाग जोरदार पावसामुळे वाहून गेला  आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाढत्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील या पर्यायी पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा काही भाग खचल्याने आणि वाहून गेल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.