सुमन महादेव बाबर यांच्या स्मरणार्थ उत्तरकार्या दिवशी ४०० वृक्षरोपांचे वाटप...
कोल्हापूर – कागल तालुक्यातील बानगे येथील सुमन महादेव बाबर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ उत्तरकार्याच्या दिवशी बाबर कुटुंबियांच्यावतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवत ४०० वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले आहे.
उत्तरकार्याच्या दिवशी पर्यावरण संवर्धनाचा संदेश जपत नातेवाईक आणि मित्रपरिवारांना एक वृक्षरोप भेट देण्यात आले. या माध्यमातून सुमन महादेव बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सुमन महादेव बाबर यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.