टीईटी पेपरफुटीवरून विधानपरिषदेत खडाजंगी : 'सर्व कामकाज बाजूला ठेवून खुली चर्चा करा' : आ. सतेज पाटलांची मागणी

टीईटी गैरप्रकारावरून आ. सतेज पाटील आक्रमक

<p>टीईटी पेपरफुटीवरून विधानपरिषदेत खडाजंगी : 'सर्व कामकाज बाजूला ठेवून खुली चर्चा करा' : आ. सतेज पाटलांची मागणी</p>

मुंबई – विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत टीईटी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत ६ लाख परिक्षार्थीसाठी असलेली ही परीक्षा पारदर्शकपणे सरकारला घेता येत नाही, हे या राज्याचे दुर्दैव असून पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि देशभरात राज्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेऊन पेपरफुटीवर खुली चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार सतेज पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात उत्तर देताना, सरकार याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे सांगत याबाबत लवकरच सविस्तर विवरण मी सभागृहात मांडेन,' असे आश्वासन दिले.

 दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकुब केले.