शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

<p>शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात</p>

कोल्हापूर - शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयातील निमतणदार संजय बाबू तेली यांना  दोन हजारांची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदाराने त्यांच्या मिळकतवारीतील वारस नोंद आणि  फेरफार नोंद पूर्ण करण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित कामासाठी निमतणदार संजय तेली यांनी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. या  तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.  या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.