उद्धव ठाकरेंना मोठा धक्का...एक आमदार शिंदेच्या गळाला

<p>उद्धव ठाकरेंना मोठा धक्का...एक आमदार शिंदेच्या गळाला</p>

मुंबई - उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आ. सचिन अहिर हे एकनाथ शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या अनुषंगाने आ.सचिन अहिर यांनी आज शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

विधान परिषदेत ठाकरे गटाचे एकूण सहा आमदार होते. मात्र, आता सचिन अहिर हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाचे फक्त पाच आमदार राहिले आहेत. सचिन अहिर यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर  पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होणार का हे पहावे लागणार आहे.