अखेर सहा बंडखोर खासदारांचा शिंदे गटात प्रवेश...
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून नॉटरिचेबल असलेले ठाकरे गटाचे सहा बंडखोर खासदार आज मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर या सर्व सहा खासदारांनी धनुष्यबाण हाती घेतले आहे. त्यामुळे या सर्व खासदारांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदेंच्या गटात प्रवेश केल्याचे निश्चित झाले आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आता थेट षटकार मारला आहे. आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने लढा सुरु आहे. हा आताचा दुसरा टप्पा पार पडल्याचे म्हटले आहे.