खळबळजनक : नूल येथे पतीकडून पत्नीचा खून

<p>खळबळजनक : नूल येथे पतीकडून पत्नीचा खून</p>

कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची विळयाने सपासप वार करून निघृणपणे हत्या केली आहे. ही सर्व घटना काल रात्री उशिरा घडली. चित्रांजली भीमा चितारी असे मृत
महिलेचे नाव असून भीमा चंद्राप्पा चीतारी असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी आरोपी भीमा चितारी याला अटक केली आहे.