कोल्हापूर जिल्हयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

<p>कोल्हापूर जिल्हयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न</p>

कोल्हापूर - जागतिक योग दिनानिमित्त जरग फाऊंडेशनच्यावतीने ध्यान धारणा शिबिर आयोजित करण्यात आले होते. रणजित चीकोडे यांनी यावेळी ध्यान धारणा कशी करायची, त्याचे मार्ग कोणते, बैठक व्यवस्था कशी असावी, सुरवात कशी करावी, ध्यान धारणेचे फायदे काय, सप्तचक्र कसे कार्यरत करायचे याविषयी मार्गदर्शन केले.

जरग फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग यांच्यासह नियोजन समितीने याचे आयोजन केले. डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, संचलित मास्टर दिनानाथ विद्यामंदिर, या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा निलम मठपती उपस्थित होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत योगामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा साधला जातो, याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विश्वास केसरकर आणि सुरेश चौगले यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.