आज अंतिम निर्णय घेणार...: खा. ओमराजे निंबाळकर धाराशिवला रवाना
पुणे - पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल काल लागल्यानंतर नाराज झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर भाष्य केले आहे.
जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी ते आज सकाळी पुण्याहून धाराशिवसाठी रवाना झाले आहेत. धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या राजकीय भूमिकेविषयी स्पष्टीकरण देणार आहेत.