जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं रात्रभर आंदोलन ; दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच...
नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कालपासून दिल्लीतील जंतर – मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी काल रात्रभर आंदोलन चालूच ठेवले होते.
आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरु आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही आंदोलन स्थळावरून हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी अभिजीत दीपके यांनी, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचे अन्न आणि पाण्याचा पुरवठा रोखल्याचा आरोप केला आहे.