केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कोल्हापूर आयुक्तालयाच्यावतीने योग दिन उत्साहात...
कोल्हापूर - केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कोल्हापूर आयुक्तालयाच्यावतीने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरू श्रीमती आसावरी कागवाडे आणि महादेव कागवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योगाचे अमूल्य पैलू, पारंपरिक ज्ञान आणि योगाचे आयुष्यभरासाठी होणारे फायदे याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्वागत आयुक्त सुमित कुमार यादव यांनी केले.
या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.