रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीस

<p>रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीस</p>

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, तर सचिवपदी उद्योजक अविनाश चिकनीस यांनी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ रोटेरियन सी. एम. बेंद्रे यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना सी. एम. बेंद्रे यांनी रोटरीच्या माध्यमातून माणुसकी जपत समाजातील विविध घटकांना मदत करण्याबरोबरच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

मावळते अध्यक्ष अभिजीत भोसले यांनी गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष डॉ. शेंडगे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. सचिव अविनाश चिकनीस यांनी आभार मानले. यावेळी रवी खोत आणि आर. वाय. पाटील यांचा ‘उत्कृष्ट रोटेरियन’ म्हणून गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन संदीप साळोखे यांनी केले.

समारंभास असिस्टंट गव्हर्नर अभयसिंह बिचकर, संजय साळोखे, नीलेश पाटील यांच्यासह रोटेरियन आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.