स्मार्ट मीटरला मुरगूडकरांचा विरोध; महावितरण कार्यालयावर मोर्चा

<p>स्मार्ट मीटरला मुरगूडकरांचा विरोध; महावितरण कार्यालयावर मोर्चा</p>

कोल्हापूर - महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागातून विरोध होत आहे. स्मार्ट मीटर विरोधात मुरगूड शहरातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी महात्मा तुकाराम चौकातून मोर्चाला सुरूवात झाली बाजारपेठेतून हा मोर्चा महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या. स्मार्ट मीटर जोडणी थांबवावी, या मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता मार्गशिर्षा चौगुले आणि सुरेश कोकणे यांना दिले.

या मोर्चात बबन बारदेस्कर, दगडू शेणवी, सुरेश साळोखे, समाधान हिंदळकर, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, सिकंदर जमादार, समाधान बोते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.