महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करा : महाविकास आघाडीची मागणी 

सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

<p>महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करा : महाविकास आघाडीची मागणी </p>

मुंबई – उद्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून राज्य सरकारविषयी रोष व्यक्त केला आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. 
सरकारने राज्यातील पाण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अशा वेळी सरकारने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.  विकासाच्या नावाने केवळ जंगलतोड सुरू असल्याचा हल्लाबोल यावेळी  ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. राज्यात घोटाळे खूप होत आहेत पण सरकार कारवाई करत नाही. पेपर फुटीचे मुळ महाराष्ट्रात आहे हे दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांना वन इलेक्शन, वन पार्टी करायचं आहे. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याची टीकाही आ. जयंत पाटील यांनी केली आहे.