मुंबई, पुण्यामध्ये पावसाच्या सरी...
मुंबई – राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण झाले आहे. तसेच काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणही निर्माण झाले आहे. त्यानुसार मुंबई आणि पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे जनतेला उकाड्यापासून थोडा फार दिलासा मिळाला आहे.
22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रा लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढून 24 ते 26 जून दरम्यान, तो उत्तर कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचू शकतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.