आशा भोसलेंना आदरांजली वाहताना राहुल नार्वेकर चुकले...

<p>आशा भोसलेंना आदरांजली वाहताना राहुल नार्वेकर चुकले...</p>

मुंबई – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बोलताना चूक झाल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. 
अधिवेशन सुरु झाले की पहिल्या दिवशी आधीच्या अधिवेशनापासून या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपर्यंत ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झाले आहे. त्यांना आदरांजली वाहिली जाते. श्रद्धांजली प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवला जातो. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सदस्य श्रद्धांजली वाहतात ही सभागृहाची परंपरा आहे. मात्र यावेळी राहुल नार्वेकर यांनी, दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर असा केल्याने त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका होत आहे.