विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर…
मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजपने 11, शिवसेनेने 4 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती. आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला आहे.
एका जागेवर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का देत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांचा विजय झाला आहे. भाजपचे 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे.