दोघा आंतरराज्य चेन स्नॅचरना अटक... ; पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आंतरराज्य गुन्हेगार वैभव आडोळे साथीदाराच्या मदतीने कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंग करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे - शिरवळ परिसरात आठवडाभर पाळत ठेवून वैभव आडोळेसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
पोलिसांनी चेन स्नॅचिंगचे दहा, दुचाकी चोरीचे दोन असे बारा गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी असा चौदा लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.