‘या’ औषधांवर केंद्राने घातली बंदी...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आरोग्यासाठी धोकादायक औषधे ओळखून ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडसह इथोहेप्टाझिन, डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल आणि क्लिडिनियम ब्रोमाइड, डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल, क्लिडिनियम ब्रोमाइड आणि क्लोरडायझेपॉक्साइड, ग्लिक्लाझाइडसह क्रोमियम पिकोलिनेट आणि पॅरासिटामॉलसह लिग्नोकेन या औषधांवर बंदी घातली आहे.
या बंदीमुळे त्वचाविकार, वेदनाशामक, पोटदुखीवरील, मधुमेहविरोधी आणि प्रतिजैविक अशा विविध प्रकारच्या औषधावर परिणाम झाला आहे. तसेच केंद्राने मिश्र औषधांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वितरणावर कायमची बंदी घातली आहे.