महायुती सरकारने पुरवणी मागण्या मांडून कंबरेचे सोडून डोक्याला बांधलं : आ.सतेज पाटील यांचा हल्लाबोल 

<p>महायुती सरकारने पुरवणी मागण्या मांडून कंबरेचे सोडून डोक्याला बांधलं : आ.सतेज पाटील यांचा हल्लाबोल </p>

मुंबई – महायुती सरकारने तब्बल ९७,७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.  

 आ. सतेज पाटील यांनी म्हटले आहे कि, राज्याचे आर्थिक नियोजन हे राजकीय टीका-टिप्पणीचा विषय नाही. मात्र मागील अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झालेला असताना, आता ९७,७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. याला वित्तीय बेशिस्ती असे म्हणतात, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. 
 मूळ अर्थसंकल्प बनवताना भविष्यातील खर्चांचा अंदाज घेण्यात सरकार अपयशी ठरले. शिवाय या अतिरिक्त खर्चासाठी पैसा कुठून येणार आहे? अर्थातच, सरकारला कर्ज काढावे लागेल. यामुळे राज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढणार. पुरवणी मागणीचा उपयोग अपवाद म्हणून व्हायला हवा. मात्र हे सरकार बेजबाबदारपणे वागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.