भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, पण...: खा.ओमराजे निंबाळकर

<p>भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, पण...: खा.ओमराजे निंबाळकर</p>

मुंबई – ठाकरे गटामधून बंडखोरी केलेले खा. ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास मी बरोबर असल्याचं”, खा. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. 
खा. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे कि, “मी सध्या पुण्यात असून २० जूनला वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. समोर सत्ता आणि पैसा आहे. तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील तर लोकांसमोर कसे जायचे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”