गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक… सुमारे सव्वा बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

<p>गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक… सुमारे सव्वा बारा लाखाचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर – उजळाईवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून सुमारे सव्वा बारा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उजळाईवाडी येथील तलावाच्या जवळ काही तरूण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या राजकिरण मोरे, संतोष माने  आणि सोमनाथ मंडले या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ किलो वजनाचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चार चाकी वाहन आणि दुचाकी असा सुमारे १२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.