शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्याची मिळाली परवानगी...

<p>शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्याची मिळाली परवानगी...</p>

कोल्हापूर – गेल्या चार दिवसांपासून नदीवरील उपसा बंदी उठवण्यात यावी, यासाठी शेतकरी ठिय्या आंदोलन करत होते. आज अखेर या आंदोलनावर तोडगा काढत जलसंपदा विभागाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी उपसाबंदीचा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे. आजपासून पुढील तीन दिवस शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.