...आणखी 13 -14 आमदार फुटणार : शिंदेच्या ‘या’ आमदाराचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई – ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर' ला मोठं यश आले आहे. यावर बोलताना शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी, ठाकरे गटाचे आणखी 13 ते 14 आमदार फुटणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केले आहे.
आमदार संतोष बांगर यांनी म्हटले आहे कि, सहा महिन्यांपूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहाही खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्हाला जशी बातमी कळली तसे आम्ही नागेश पाटील आष्टीकर यांचे स्वागत हिंगोलीमध्ये केलेलं आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिवसेनेमधील प्रवेशानंतर पक्षाला बळ मिळणार आहे, यामुळे शिवसेना वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.