प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि सत्ताधाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे पाणीटंचाई : राजेश लाटकर
कोल्हापूर - कोल्हापूर पाणी पाणी करतंय, शहरातील लोकांना पाणी मिळत नाहीत. सत्ताधारी, प्रशासन आणि जलसिंचन विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधीपक्ष नेते राजेश लाटकर यांनी केला आहे.
तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्यावर टीका केली. काही मोजक्या लोकांच्या हितासाठी शहरातील लाखो नागरिकांच्या भावनांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाणीटंचाई आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून बुधवारच्या महासभेत आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण पहायला मिळाले आहे.