महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पसार झालेल्या संशयिताला अटक

<p>महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पसार झालेल्या संशयिताला अटक</p>

इचलकरंजी - शहरात दोन दिवसांपूर्वी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची बोरमाळ अज्ञात इसमाने हिसकावून नेली होती. याबाबत संबंधित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कर्नाटकातील सौंदत्ती येथील समीर पेंडारी याला अटक केली आहे. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.