राजमाता जिजाऊंना शिवाजी तरुण मंडळाचा मानाचा मुजरा

<p>राजमाता जिजाऊंना शिवाजी तरुण मंडळाचा मानाचा मुजरा</p>

कोल्हापूर - शिवाजी पेठ येथील शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने  हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
 यावेळी समितीचे अध्यक्ष अनिकेत सरनाईक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा करण्यात आला. स्वराज्य, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचे विचार समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद केले.
या वेळी  रवींद्र साळुंखे, रुपेश इंगवले, सौधन अपराध, शैलेश साळोखे, सुनील राऊत, सुरज साळोखे, पिंटू साळोखे, पिंटू जाधव, ओंकार गोसावी आदी उपस्थित होते.