बीड, वाशिममध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा संताप ; कार्यकर्त्यांचा रोष वाढला
बीड – उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून खासदारांची फुट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या फुटीमुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या फुटीविरोधात बीड आणि वाशिम येथे खासदारांचे फलक लावून रोष व्यक्त केला जात आहे.
यावेळी शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षफोडीच्या राजकारणाचा निषेध केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात जनआक्रोश उसळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.