आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार : खा. संजय राऊतांचा संताप 

<p>आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार : खा. संजय राऊतांचा संताप </p>

नवी दिल्ली – सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर संतापलेल्या खा. संजय राऊत यांनी, “आमची लढाई आता लोकसभेत, कोर्टात चालेल. आता रस्त्यावरची लढाई सुरु झाली आहे. आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याचा इशारा त्यांनी बंडखोरांना दिला आहे. 
तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणत आहात, पण असे पळणारे टायगर कधी असतात का? आम्ही टायगर आहोत. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होईल. फुटून गेलेले खासदार निवडणूक हरणार आहेत. त्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना गद्दार म्हणणार नाही, तुम्ही आमचे चिन्ह, आमच्या पैशावर निवडणूक जिंकलात, या लोकांना आम्ही बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो. हे सगळे लोकं पैशाने विकत गेले आहेत. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले, आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले आहेत, असा दावा खा. राऊत यांनी केला आहे.