अपात्र दुध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाद मागणार : आ.सतेज पाटील गटाची भूमिका 

<p>अपात्र दुध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाद मागणार : आ.सतेज पाटील गटाची भूमिका </p>

कोल्हापूर -  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळशी संलग्न ५६९ अंतिम अवसायनातील अपात्र संस्थांच्यावतीने न्यायालयात दाद मागून सदर संस्थांना न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका आमदार सतेज पाटील गटाच्यावतीने घेण्यात  आली आहे.
 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गोकुळ दुध संघाशी संग्लन असणाऱ्या १ हजार ३२० संस्थांपैकी ५६९ संस्था अपात्र ठरवल्या होत्या. यावर सतेज पाटील गटाच्यावतीने जोरदार हरकत घेण्यात आली आहे. गोकुळशी संलग्न ५६९ अंतिम अवसायनातील अपात्र संस्थेच्यावतीने न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार सतेज पाटील गटाच्यावतीने सांगण्यात आले आहे.