अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पडली फुट ; पक्षाच्या बैठकीला सहा खासदारांची अनुपस्थिती
नवी दिल्ली – आज नवी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप बजावून नऊ खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ९ खासदारांपैकी फक्त तीनच खासदारांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. अन्य सहा खासदारांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत फुट पडल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार बैठकीला गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर' ला यश आल्याचे दिसून येत आहे. या सहा खासदारांनी व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना पक्षाकडून नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.