बंडखोर खासदार संजय जाधव यांच्याकडून सोशल मिडीयावरून पोस्ट शेअर... 

<p>बंडखोर खासदार संजय जाधव यांच्याकडून सोशल मिडीयावरून पोस्ट शेअर... </p>

मुंबई -  शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त बंडखोर खासदार संजय जाधव यांनी आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व... 60 वर्ष हिंदुत्वाशी वचनबद्धता' असा मजकूर त्यांनी लिहिला आहे. 

त्यांच्या पोस्टवरुन मशाल चिन्ह गायब असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टवर उद्धव ठाकरे यांचा फोटोही नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे  यांचा फोटो आहे. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माची पालखी वाहणाऱ्या बंडू जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्त्वाची मशाल हातात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.