खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट...

<p>खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट...</p>

मुंबई – शिवसेनेत दुसऱ्यांदा फुट पडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. खासदार फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सोशल मिडीयावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी एक कविता पोस्ट केली आहे

"किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी..." या काव्यपंक्तींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अंधारानंतर प्रकाशाचा मार्ग शोधण्याचा संदेश दिला आहे. राजकीय संकटे आणि अडचणींच्या काळातही हार न मानता नव्या उमेदीने पुढे जाण्याचा त्यांचा निर्धार या पोस्टमधून दिसून आला आहे.