खासदार - आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा...: खा.अरविंद सावंतांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण 

<p>खासदार - आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा...: खा.अरविंद सावंतांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण </p>

नवी दिल्ली – उद्धव ठाकरे गटातील सहा  खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाचे  गटनेते अरविंद सावंत यांनी पक्षाचा व्हीप बजावला आहे. याबाबत आज पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. यावर बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण काढली. 
बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढं एखादा खासदार - आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. 
खा. संजय राऊत म्हणाले की, व्हीप हा पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. खासदारांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. हा व्हीप प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, घरी गेलेला आहे, व्हाटसअपवर आणि ईमेलवर व्हीप पाठवला आहे, असं त्यांनी सांगितले आहे.