पक्षात पुन्हा बंडखोरी झाली तर जनता गप बसणार नाही : खा. संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा 

...तर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई होईल : अनिल देसाई

<p>पक्षात पुन्हा बंडखोरी झाली तर जनता गप बसणार नाही : खा. संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा </p>

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' राबवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, संजय देशमुख, ओमराजे  निंबाळकर हे सर्व खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याची  माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेवून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 
यावेळी बोलताना खा. संजय राऊत यांनी,  सर्व खासदार मशालीवर निवडून आले आहेत. त्यामुळे कुणालाही अशी बेईमानी करण्याचा अधिकार नाही. पक्षात पुन्हा बंडखोरी झाली तर जनता गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी बंडखोरांना दिला आहे. ज्या खासदारांना दुसरीकडं जायचं आहे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि जावं कारण ते पक्षाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या कष्टामुळे निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत अनिल देसाई यांनी पक्षाकडून व्हीप जारी केला असल्याचे सांगितले आहे. उद्या पक्षाची बैठक बोलावली असून त्याला जर हे खासदार उपस्थित राहिले नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.