राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ : ठाकरे गटाचे ‘हे’ खासदार दिल्लीत दाखल 

<p>राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ : ठाकरे गटाचे ‘हे’ खासदार दिल्लीत दाखल </p>

मुंबई – शिंदेंच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' राबवलं जात असल्याची चर्चा राजकारणात रंगू लागली आहे. त्यानुसार  ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या गळयाला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दिल्लीत दाखल झाले आहेत. काल (मंगळवारी) रात्री १ वाजता एका खाजगी विमानाने त्यांनी पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.