‘आपापसात मतभेद होतात तेव्हा...’: छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य 

<p>‘आपापसात मतभेद होतात तेव्हा...’: छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य </p>

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छूक होते. तसेच त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती असं काहीच न होता पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु आहे असं असताना  छगन भुजबळ यांनी, ‘पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. आपापसात मतभेद होतात तेव्हा, आपण घर सोडत नाही’, असे सूचक वक्तव्य केले आहे. 
गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात. पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.